साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
शहरात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचोरा नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेला गती दिलेली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा, सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन परिसर, शहरातील मुख्य चौक आदी ठिकाणी शनिवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. यापुढेही अशीच मोहीम सुरु राहणार असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगीतले.
यावेळी शहरातील के.एम.बापू परिसरातील भाजी मंडीतील साचलेला कचरा, नगरपालिका कार्यालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर तसेच शहरातील इतर व्यापारी संकुल परिसरातून छोट्या हातगाड्याद्वारे कचरा गोळा करुन ट्रॅक्टरद्वारे उचलण्यात आला. तसेच व्यापारी संकुल परिसरातील भाजीपाला व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व दुकानदार यांना उघड्यावर कचरा फेकू नये, याबाबत कडक सूचना दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, आरोग्य निरीक्षक विरेंद्र घारू, प्रकाश पवार, ललित सोनार, विशाल दिक्षीत, भागवत पाटील, रोहीत अहिरे, अर्षद पिंजारी, प्रशांत बडगुजर, भावेश पाटील, आकाश खेडकर, रवींद्र पवार, मुकादम विनोद सोनवणे, निळकंठ ब्राह्मणे, बापू ब्राह्मणे, देवीदास देहडे आदी उपस्थित होते.