चोपड्यातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीसह इतर समस्या सोडवा

0
9

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

शहरातील प्रमुख रस्ते त्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल मंदिरपर्यंत मेन रोड, ग्रामीण पोलीस स्टेशन ते चिंच चौक, राणी लक्ष्मीबाई चौक ते थाळनेर दरवाजा, आझाद चौक ते बोहरा गल्ली यासह अनेक वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अक्षरशा या रस्त्यांची चाळण झालेली आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी स्थिती झालेली आहे. म्हणून हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. दिवसातून या रस्त्यांचा तीन ते चार वेळा कामानिमित्त वापर करावा लागतो. त्यामुळे मणक्यांमध्ये गॅप निर्माण होऊन पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखणे, खांदे दुखणे यासारखे आजार शहरवासियांना जडलेले आहेत. चांगले रस्ते देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे तात्काळ डांबरीकरणातून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशा आशयाचे निवेदन चोपडा तालुका आणि शहर काँग्रेसतर्फे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चव्हाण यांना मंगळवारी, १२ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता देण्यात आले. आचारसंहितेचा अडथळा होत नसेल तर सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी निवेदन स्वीकारतांना दिले.

चोपडा शहरात भटके कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या भटक्या कुत्र्यांना त्वचेचे आजारही झालेले आहेत. म्हणून कुत्र्यांच्या त्वचेवरील जिवाणू किंवा विषाणू हे मानवाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर मानवासही त्वचेचे आजार किंवा इतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणून भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. चौकाचौकात आणि गल्लोगल्लीत मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यवर्ती भागात बसलेले दिसून येतात. तसेच मोकाट जनावरे जिथे बसलेले असतात. त्याच परिसरात मल (शेण) टाकतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. म्हणून मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करण्यात यावा. मोकाट जनावरांच्या मालकांना याबाबत तुमची जनावरे दावणीला बांधण्यात यावी, अशा सूचना देऊन मोकाट जनावरांची शहरातील संख्या कमी करावी, आदी बाबींचाही समावेश निवेदनात केला आहे. सर्व समस्यांवर तोडगा न निघाल्यास काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.

निवेदन देतेवेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष ॲड. संदीप पाटील, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर, रमेश शिंदे, मधुकर पाटील, डॉ.अशोकराव कदम, मंगेश भोईटे, देविदास सोनवणे, किशोर पाटील, अकबर पिंजारी, सोहम सोनवणे, गौतम छाजेड, मोहन देवराम पाटील, प्रतापराव सोनवणे, धनंजय पाटील, विलास दारुंटे, देविदास पारधी, बाळकृष्ण पाटील, राजेंद्र पाटील, अशोक साळुंखे, हाजी महमूद तेली, लक्ष्मण काविरे, दत्तात्रय साळुंखे, सतीश पाटील आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here