Jain Irrigation Company : ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ पुरस्काराने जैन इरिगेशन कंपनी सन्मानित

0
16

पुरस्कारात मानपत्रासह सन्मानचिन्हाचा समावेश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसित करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे अत्यंत प्रतिष्ठित तथा मानाचा समजला जाणारा ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभाला कोईमतूर येथील ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ शुगरकेन रिसर्च’ संस्थेचे संचालक डॉ. पी. गोविंदराज, नॅशनल रिसर्च इन्स्टिटयूट ऑन इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आर. थंगवेलू आणि तामिळनाडू आदिवासी विभागाचे संचालक श्री. एस. अण्णादुराई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे गेल्या २१ ऑगस्ट १९९३ रोजी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राची स्थापना केली होती. त्यामुळे संस्थेचा ३२ वा स्थापना दिन होता. त्यानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलोरचे संचालक तुषार कांती बेहरा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्यावतीने कंपनीच्या केळी विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील, टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. पुरस्कारात मानपत्रासह सन्मानचिन्ह यांचा समावेश आहे.

कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष भवरलाल जैन यांनी खान्देशासह महाराष्ट्रातील केळींची परदेशात निर्यात व्हावी, असे स्वप्न जे पाहिले होते, ते जैन कंपनीच्या अथक परिश्रम, कार्यामुळे पूर्णत्वाला जाऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची पहाट फुलवली आहे. त्यामुळेच निवड समितीने जैन इरिगेशनची पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

परिश्रम घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

जैन इरिगेशन कंपनी उत्पादित करीत असलेल्या केळी रोपांसह ठिबक सिंचन, पीव्हीसी, एचडीपीई पाईप आणि अन्य सर्व साहित्यावर अतोनात विश्वास, श्रद्धा ठेवून परिश्रम घेणाऱ्या शेतकऱ्यांचा हा सन्मान आहे. त्यांना हा पुरस्कार आम्ही आदरपूर्वक समर्पित करतो, असे डॉ. के.बी. पाटील, डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here