श्री गो.से.हायस्कूलला ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ मिळालेला प्रथम क्रमांक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या योगदानातून : संस्थाध्यक्ष दिलीप वाघ

0
30

संस्थेतर्फे केलेल्या सन्मानाने शिक्षक, कर्मचारी भारावले

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

जिल्ह्यात अग्रगण्य पाचोरा तालुका सह.शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूलने ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ अंतर्गत पाचोरा तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल संस्थेच्यावतीने शाळेचे सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा मतदारसंघांचे माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तर पुणे येथील पुरोगामी विचारवंत विकास लवांडे, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, सचिव ॲड.महेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराच्या सारोळा रस्त्यावरील श्री समर्थ लॉन्स येथे रविवारी सकाळी ११ वाजता शिक्षक सन्मान सोहळा आयोजित केला होता.
तालुक्यात व जिल्ह्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गो.से. हायस्कूल शिक्षकांनी संस्था आणि शाळेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी घेतलेल्या परिश्रमाची सत्कार रुपात परतफेड करण्यासाठी संस्थेच्यावतीने केलेल्या सन्मानाने शिक्षक, कर्मचारी भारावले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विकास लवांडे यांनी शिक्षकांना अध्ययन, अध्यापन प्रक्रियेसंदर्भात उपयुक्त सूचना केल्या. शिक्षकांनी आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडावे. विद्यार्थी माणूस करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही प्रकारचा भेदभाव विद्यार्थ्यांच्या मनात राहणार नाही अशी शिकवण द्यावी.

यांची लाभली उपस्थिती

सोहळ्यास संजय वाघ, ॲड.महेश देशमुख, व्ही. टी. जोशी, सुरेश पाटील, प्रा.प्रदीप पाटील (चोपडा), गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, गणेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, खलील देशमुख, दगाजी वाघ, विनय जकातदार, संचालक नानासाहेब देशमुख, वासुदेव महाजन, जगदीश सोनार, हर्षल पाटील, शालिग्राम मालकर, प्रा.राजेंद्र चिंचोले, सिताराम पाटील, सतीश चौधरी, शिवदास पाटील, नितीन तावडे, विकास पाटील, मधुकर पाटील, भूषण वाघ, अर्जुनदास पंजाबी, अँड.अविनाश सुतार, डॉ.जयंत पाटील, वासुदेव महाजन, अर्जुन पंजाबी, प्रा.भागवत महालपुरे, डॉ.स्वप्निल पाटील, शशिकांत चंदिले, हारुन देशमुख, ललित वाघ, अझरखान आदी उपस्थित होते. कार्यक्रमात हायस्कूलच्या प्रगतीची चित्रफीत दाखविण्यात आली.

अध्यक्षांनी केले योगदानासंदर्भात कौतुक

संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मानपत्र प्रदान केले. दिलीप वाघ यांनी मनोगतात शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळा विकासासाठी दिलेल्या योगदानासंदर्भात कौतुक केले. गो से. हायस्कूलमधील विविध विद्यार्थी हिताच्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी सत्काराचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक चेअरमन संजय वाघ, सूत्रसंचलन महेश कौंडीण्य तर आभार आर. बी. बोरसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here