Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»बंडखोर आ.पाटील यांच्या मतदार संघात ठाकरे यांचा उद्या शिवसंवाद दौरा
    Uncategorized

    बंडखोर आ.पाटील यांच्या मतदार संघात ठाकरे यांचा उद्या शिवसंवाद दौरा

    SaimatBy SaimatAugust 19, 2022Updated:August 19, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह  पाचोरा प्रतिनिधी 

    माजी मंत्री शिवसेना युवा प्रमुख यांच्या जिल्हा शिव संवाद दौऱ्याची पाचोरा नगरीतून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. ओ. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या पासून मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आर.ओ. पाटील यांच्या कन्या दिली.

    यावेळी विधानसभा क्षेत्र जेष्ठ शिवसैनिक शेतकरी सेना तालुकाप्रमुख, रमेश बाफना, उपजिल्हा प्रमुख ॲड.अभय पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे, आजी तालुकाप्रमुख शरद पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, नाना वाघ, सह शिवसैनिक उपस्थित होते.
    युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 20 ऑगस्ट मंगळवार रोजी जळगांव जिल्ह्याच्या शिव संवाद दौऱ्याची सुरुवात पाचोरा येथून सुरुवात होणार आहे.आदित्य ठाकरे पाचोरा शहराकडे येतांना त्यांचे सामनेर व जागोजागी शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. जारगाव चौफुली मार्गे ते भडगावरोड वरील महाराणा प्रताप चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौकातून, छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा स्मारकात अभिवादन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून शिवसेनेचे मध्यवर्ती शिवतीर्थ कार्यालयासमोरील रस्त्यावर जनतेशी संवाद साधणार आहेत .
    युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, हर्षल माने, विष्णू भंगाळे, दिपक राजपूत, समाधान महाजन, महिला आघाडीच्या पदाधिकारी महानंदा पाटील, जळगांव महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे आदींचा समावेश असणार आहे.
    पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद दौऱ्यापासून मतदार संघाच्या आणि राज्याच्या शिवसेनेच्या दोन गटांच्या राजकीय धुराळ्यात मूळ शिवसेनेचे दावेदार सेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवधनुष्य हातात आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला भगवा खांद्यावर घेऊन पाचोरा – भडगाव मतदार संघात राजकीय परंपरा तोडून दोन वेळा आमदार झालेले स्व. आर.ओ.पाटील यांच्या सुकन्या वैशाली सुर्यवंशी ह्या राजकीय रणसंग्रामात तयारीनिशी उतरणार आहेत. वैशाली सुर्यवंशी यांच्या सक्रिय राजकारणामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत राजकीय संघर्ष पहायला मिळेल अशा चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्याचे नेतृत्व वैशाली पाटील ह्या करणार असून यावेळी काही जणांचे प्रवेश होणार आहे. पाचोरा नगरीत संवाद साधल्या नंतर आदित्य ठाकरे हे निर्मल सिड्स येथे भेट देऊन भडगावला जातील तेथे नियोजित कार्यक्रमा नंतर त्या पुढील आयोजित कार्यक्रमास रवाना होणार आहे.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढत आहे.त्यांच्या शिवसंवाद दौऱ्यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसाच उस्फूर्त प्रतिसाद पाचोरा-भडगाव मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद देण्याचे आवाहन वैशाली सुर्यवंशी यांनी जनतेला केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Titwala Crime News : अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनप्रकरणी क्रिकेट कोच अटकेत

    March 27, 2026

    SC Holiday Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धार्मिक सणासाठी सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.