विजयस्तंभ परिसरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला तीव्र शोक
साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :
गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात होऊन दोनशेंच्यावर प्रवाशांसह अन्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा सर्व निष्पाप नागरिकांना शिरपूर शहरातील विजयस्तंभ परिसरातील व्यापाऱ्यांनी तीव्र शोक व्यक्त करुन मृतांना रविवारी, १५ जून रोजी सायंकाळी आदरांजली वाहिली.
याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी उपस्थित नागरिकांसह व्यापाऱ्यांच्यावतीने सर्व मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. अपघातात बळी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांच्या कठीणप्रसंगी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
मेणबत्त्या प्रज्ज्वलित करुन पाळले मौन
याप्रसंगी सर्व बळी गेलेल्यांच्या प्रती मेणबत्त्या प्रज्ज्वलित करुन मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भोई, व्यापारी मुबीन शेख, जितेंद्र पाटील, अनिल बोरसे, निलेश चावडा, रवींद्र शिंपी, नरेश गवळे, सोनु न्हावी, धनु जैन, जयराज सिंधी, पुना चांभार, ओमुशेठ अग्रवाल आदी उपस्थित होते.



