साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी
शिर्डीच्या साई बाबा मंदिराला देण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या CIFS सुरक्षेला विरोध करत येत्या 1 मे पासून शिर्डी गाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. मात्र या बंद मध्ये साई बाबा मंदिर सहभागी होणारं नाही त्यामुळे भाविकांसाठी मंदिर खुलं राहणार आहे.
साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मंदिर प्रशासनाला अनेक वेळा मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 2018 साली सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यानूसार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील मंदिराला केंद्रीय CIFS सुरक्षा देण्याचे निर्देश दिले होते. तर न्यायालयाने याबाबत मंदिर प्रशासनाला देखील आपले म्हणणे मागवले आहे.
दरम्यान मंदिर प्रशासनाने देखील सुरक्षा व्यवस्थेला मंजुरी देऊ शकते. मात्र मंदिरात केंद्रीय सुरक्षा लागू झाल्यास गावकऱ्यांसह भाविक भक्तांना देखील दर्शनासाठी मोठी कसरत आणि त्रास सहन करवा लागेल त्यामुळे केंद्रीय सुरक्षेला शिर्डी गावकऱ्यांनीं विरोध दर्शविला आहे.
त्याचं पार्श्वभूमीवर 1 मे पासून शिर्डी गावकऱ्यांनीं शिर्डी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या बंदमध्ये भाविक, भक्तांना दर्शनासाठी त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने या बंद मध्ये सहभागी होणार नाहीये. तसेच गेस्ट हाऊस आणि लॉजिंग हे सुरू राहणार आहेत जेणेकरुन भाविकांची गैरसोय होणार नाही.
काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या…
- साईबाबा मंदीराला CISF सुरक्षा व्यवस्था नको.. आहेतीच सुरक्षा योग्य
- साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद IAS अधिकारीकडे नको. हे पद रद्द करून, शासनाचा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकारीकडे असावे.
- साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेले तदर्थ समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असून सर्व निर्णय प्रलंबित आहे. तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी.
- शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमणूक करण्यात यावे. यात शिर्डीतील 50℅ विश्वस्त नेमणूक करावे.