ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन

0
31

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.  हरी रामचंद्र नरके यांची लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी बहुआयामी ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समाव्ोश करण्यासाठी िंकवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या आणि तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट िंकवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता िंकवा जातीचा समाव्ोश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस करतो.
प्रा. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील आहेत. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.

दोन पुस्तके प्रसिद्ध
प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ या दोन पुस्तकांचा समाव्ोश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here