साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधत व्याख्यानासह चर्चासत्राचे आयोजन करून “माहिती अधिकार कायदा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य एम.ए.मराठे होते. कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून माहिती अधिकार कायदा महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्यासह आरटीआय धरणगावचे तालुकाध्यक्ष प्रा.सतिष शिंदे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे भरत शिंपी होते.
माहिती अधिकार कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावा, त्याच हेतूने शहर व परिसरातील आरटीआयचे पदाधिकारी जितेंद्र महाजन, प्रा.दीपक पाटील, अवधेश बाचपाई, मेजर ज्ञानेश्वर मराठे, भरत शिंपी, प्रभाकर ठाकूर, पी.डी.पाटील, विकास पाटील, निलेश पवार, लूनेश्वर भालेराव हे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निरंतर प्रयत्नरत असतात.
यावेळी पत्रकार सतिष शिंदे, राजेंद्र वाघ, प्राचार्य एम.ए.मराठे यांनी माहिती अधिकार कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात माहिती अधिकार दिन अंतर्गत डी.बी.वाघ यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. माहिती अधिकार कायदा सर्वांसाठी हिताचा आहे, याबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी डी.आर.नेरकर, एन.आर.कापडी, शुभांगी पाटील, जगदीश पाटील, भूषण रानवे, शिपाई लोकेश चावरे, एस.आर.चव्हाण, मेस्कोचे सतिष पाटील, शांताराम जाधव आदींसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डी.एन.परदेशी तर आभार एस.डी.मेढे यांनी मानले.