साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ ह्या उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरुन शालेय विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी आयोजित केली होती. रॅलीत बुरहानी इंग्लीश मेडीयम स्कूल आणि सु.भा.पाटील शाळा यांचा समावेश होता. रॅलीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वृक्षसंगोपन, झाडे लावा, भारत माता की जय अशा घोषणा देत रॅली हुतात्मा स्मारक येथे आणून विद्यार्थ्यांकडून पंच प्रण शपथ घेण्यात येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.
शासनाच्या महत्वाकांक्षी अशा ‘वसुधा वंदन’ उपक्रमातंर्गत शहरातील अष्टविनायक नगर येथील खुल्या जागेत ७५ देशी जातीच्या वृक्षांची अमृत वाटिका तयार करण्यात आली. यावेळी शहरातील विविध मान्यवर अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत होणाऱ्या शासनाच्या सर्व उपक्रमांना मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर निरीक्षक दगडू मराठे, संजय बाणाईते, मधुकर सूर्यवंशी, ईश्वर सोनवणे, जितेंद्र मोरे, नितीन लोखंडे, मंगेश माने, सुधीर पाटील, ललित सोनार, प्रकाश गोसावी, भारती निकुंभ, प्रगती खडसे, प्रकाश पवार, विलास देवकर, शाम ढवळे, बुरहानी शाळेचे बी.एन.पाटील, सु.भा.पाटील शाळेचे परदेशी, विशाल दिक्षीत, विलास कुंभार, किशोर मराठे, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, संदीप खैरनार, आकाश खेडकर, गजानन पाटील, नरेश आदिवाल, विठ्ठल पाटील, सुरेखा पाटील, कल्पना पवार, यमुना ब्राम्हणे, रुमा खेडकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालक ललित सोनार तर दगडू मराठे यांनी आभार मानले.