पहूर शेंदुर्णी महामार्गावर शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेची बस उलटली ; ३० विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी

0
17

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहुर ते शेंदुर्णी दरम्यान आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिरची स्कूल बस उलटली या अपघातात विद्यार्थ्यासह शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली, पहूर येथील विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिर शाळेत नेहमीप्रमाणे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळेची स्कूल बस क्रमांक दोन ही विद्यार्थ्यांना घेऊन शेंदुर्णीतील शाळेत घेऊन जात असताना पहुर शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबा दर्ग्याजवळ वळण घेत असताना स्कूल बसला अपघात झाला, या अपघातात शाळेच्या विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

बस मध्ये सुमारे 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक होते यातील 30 विद्यार्थ्यांना व दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली असून , अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड व त्यांचे सहकारी व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व या अपघातात जखमी झालेल्या शिक्षक व विद्यार्थी यांना खाजगी वाहनातून पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तातडीने उपचार करून पुढील उपचारासाठी सर्व जखमींना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.  या अपघात जखमी पैकी कोणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती आहे.

हा अपघात नेमका कसा घडला याची चर्चा नागरिकांमध्ये असून स्कूल बस वळण घेत असताना चालकाचा स्टेरिंगवरचा ताबा सुटल्याने सोमोरील निंबाच्या झाडाला आढळून हा अपघात झाल्याचे सांगितलेजात आहे.

अपघातात झालेल्या विद्यार्थी व शिक्षकाचे नावे असे असून सायली वारूळे, घनश्याम क्षिरसागर, निशा विजु कुमावत, प्रविण विकास उबाळे, गौरव बावस्कर, प्रथमेश मोरे, धिरज बारी, शिवाजी सुनिल उबाळे, स्वप्नील समाधान क्षिरसागर, ओम संतोष कुमावत,पवन श्रीकृष्ण घोंगडे, नितीन पाटील, निलेश पाटील, सौरव राजेंद्र लहासे, प्रणव दिलीप बेलदार, अदित्य विकास देशमुख, रोहित संतोष जाधव, अदित्य राजेंद्र पाटील, कोमल बापु जाधव, डिगंबर पंडित बारी ( ड्रायव्हर) , मयुरी हरिचंद्र जाधव, तुषार प्रविण कुमावत, पुनम संजय जाधव, विवेक अनिल बनकर, ओम जगदीश गोंधनखेडे हे विद्यार्थी जखमी झाले असून यातील सहा जणांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here