साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथे मराठा समाज मंडळातर्फे श्री संत तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळाचे यंदाचे आठवे वर्ष होते. यावेळी येथील श्रीराम मंदिरात सकाळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पालकमंत्र्यांनी काही अंतर पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी उद्योजक दिलीप पाटील, माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, अरविंद मानकरी उपस्थित होते. मिरवणुकीची सांगता श्री गायत्री शक्ती पीठ मंदिरात करण्यात आली.
यावेळी पं. स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी श्री संत तुकाराम बीज शहरात सुरू करणाऱ्या स्व. डॉ.व्ही.आर.पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊन समाज बांधवांनी हा संत सेवा उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल कौतुक केले. विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. यावेळी प्रा.एन.डी.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाचे डॉ.कृष्णा बिचवे, एन. एस.पाटील, उदय झवर, पिंटू कोळी, नाटेश्वर पवार, संभाजी चव्हाण, संदीप पाटील, ॲड.आवारे, गोपाल सोनवणे उपस्थित होते. शेवटी महिलांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली.
यशस्वीतेसाठी कैलास पाटील, श्रीराम पाटील, किरण पाटील, बाळू पाटील, किशोर पाटील, गोपाल पवार, विठ्ठल लंके यांच्यासह सर्व मराठा समाज बांधवांनी परिश्रम घेतले. सायंकाळी ह.भ.प. हेमंत महाराज नांद्रेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी उपाध्यक्ष भगवान मराठे यांनी आभार मानले. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.