साईमत न्यूज नेटवर्क जळगाव
येथील जीवन विमा योजना प्रतिनिधी मनोज संगीता जैन यांचे चिरंजीव संकेत जैन यांनी वयाच्या 23 व्या वर्षी सी. ए. परीक्षा प्रथम प्रयत्नात डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण होत यश प्राप्त केले आहे.
संकेत जैन भविष्यात actuaries करणार आहे. त्यास सीए करण काबरा, सीए पदमसिंह पाटील, महेंद्र झवर, सीए मुर्तीजा बंदूक वॉला, सीए हर्षित मालपाणी, सीए श्रुती काबरा यांचे मार्गदर्शन लाभले. सीए संकेत यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. 10/12 वीत त्यास 95/96 टक्के मार्क्स मिळाले होते.