Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»वाळूमाफियांकडून महसूल पथकाशी धक्काबुक्की
    क्राईम

    वाळूमाफियांकडून महसूल पथकाशी धक्काबुक्की

    saimatBy saimatAugust 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करतांना महसूल पथकाशी हुज्जत घालत धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना वराडसीम-बेलव्हाय रस्त्यावर बुधवारी घडली. याप्रकरणी मंडळाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक, मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील वराडसीम ते बेलव्हाय रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मंडळाधिकारी योगीता पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. त्यावेळी चालक अविनाश चंद्रकांत पवार (रा. बेलव्हाय, ता. भुसावळ) याला वाळू वाहतूकीचा परवाना विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ट्रॅक्टरवर कारवाई करत असतांना ट्रॅक्टर मालक किरण शेषराव शिंदे हा दुचाकीने तिथे आला. त्यावेळी मंडळाधिकारी योगीता पाटील यांच्यासह पथकाशी हुज्जत घालून त्यांना ढकलून दिले. त्यानंतर तुम्हाला पाहून घेईल अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण करून वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाले. याप्रकरणी मंडळाधिकारी योगीता पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक अविनाश चंद्रकांत पवार आणि मालक किरण शेषराव शिंदे या दोघांवर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.