साईमत, लोहारा, ता.जामनेर : वार्ताहर
येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडद्वारा संचलित डॉ.जे.जे.पंडित माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजामाता आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.एन.दांडगे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे यांच्या हस्ते जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगतपर भाषण सादर केली. तसेच कल्याणी मनोज सरोदे हिने राष्ट्रमाता जिजाऊ माता यांची वेशभूषा धारण केली होती. आपल्या कणखर आवाजाने ‘मी जिजाऊ बोलतेय’ विषयावर भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एन.दांडगे यांनी भाषणातून जिजाऊ माता यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे घडविले, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच स्वामी विवेकानंद यांना ‘युगपुरुष’ का म्हणतात, याविषयी विचार मांडले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, सूत्रसंचालन बी.एन. पाटील तर आभार वाय.पी. वानखेडे यांनी मानले.