कल्पतरू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रशिक्षणाचे आयोजन
साईमत/साक्री/प्रतिनिधी :
कल्पतरू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित साक्री महिला मंडळातर्फे नुकतेच महिलांना साबण बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक सौंदर्य साबण बनवून लघु उद्योगाला चालना कशी देण्यात येईल, हे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ललिता भावसार यांनी केले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साक्री नगर पंचायतीच्या नगरसेविका संगीता भावसार, तारकेश्वरी निकम, शीतल सोनवणे, सुमन नांद्रे उपस्थित होते. यासाठी कृतिका भावसार, रूपाली हरळे, वर्षा बच्छाव, काजल कश्यप, हर्षदा मराठे तसेच साक्री येथील शिवप्रतिष्ठानच्या महिलांनी सहकार्य केले.
महिलांसाठी प्रशिक्षण ठरले मोलाचे
कार्यक्रमाला कल्पतरू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सियामोहन शुक्ला, उपाध्यक्ष पूनम भावसार, सचिव हसमुख पांचाल, खजिनदार नगमा खान यांचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही महिलांसाठी असेच नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील, असे ट्रस्टमार्फत सांगण्यात आले. प्रशिक्षण आमच्यासाठी खूपच मोलाचे ठरले, असे प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले. तसेच प्रशिक्षणामुळे आम्ही साबण बनविण्याचा लघु उद्योग सुरू करून घरसंसाराला हातभार लावणार असल्याचे मत व्यक्त केले. प्रशिक्षणात ४० महिलांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन उपप्राचार्या शालिनी भामरे तर मयुरी बोरसे, योगिता गीते, पूनम पवार, खुशी चौधरी यांनी आभार मानले.