साक्रीला एस.टी मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
28

साईमत साक्री प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 75 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत साक्री आगारात सार्वजनिक रक्तदान शिबीर तसेच प्रवाशी महासंघातर्फे एस.टी.चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त प्रतिष्ठित मान्यवर व आगाराचे  प्रमुख यांनी योग्य मार्गदर्शन व शिबिराचे उद्घाटन केले. तसेच आगारातील होतकरू चालक, वाहक, यांत्रिक तसेच व्यापारी वर्ग व प्रवाशी बांधवांनीही वर्धापनदिनानिमित्त रक्तदान केले.

अध्यक्षस्थानी आगार प्रमुख किशोर अहिरराव होते. यावेळी कार्यशाळा अधीक्षक श्री.शिंगाणे, स्थानक प्रमुख कुणाल घरमोडे, वाहतूक सहायक निरीक्षक  प्रशांत अहिरे, सुरेश पारख (ग्राहक पंचायत, तालुकाध्यक्ष), प्रा.बी.एम.भामरे (तालुका उपाध्यक्ष), दिलीप चोरडिया (तालुका सदस्य), विलास देसले (तालुका सचिव), भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय  सोनवणे, जोशीला पगारिया (सामाजिक कार्यकर्त्या), तात्या काकडे तसेच आगारातील ज्येष्ठ लिपिक टी.के.पठाण, राजेंद्र पाटील, आगारातील कामगार नेते सचिन गाडे, साहेबराव सोनवणे, आगारातील चालक डिंगबर शिंदे, अनिल बागुल, शिवाजी बागले, शिपाई रफिक शेख, सुनील ढालवाले, वाहक किरण पाटील, यांच्यासह वाहक, चालक, इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here