साईमतची दखल : नगरपालिका प्रशासन खडबडून झाले  जागे  बाहेरपुऱ्यात रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम टाकून  भर टाकण्याची मोहिम सुरू

0
65

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी
बाहेरपुऱ्यातील रस्त्यासाठी व मूलभूत सुविधा तसेच शासकीय योजना व शासकीय मोहिम याचा नागरिकांना लाभ मिळावा अशा विविध विषयांवर  नागरिकांना न्याय देण्यासाठी सायंदैनिक साईमतने काल विशेष  वृत्ताव्दारे प्रकाशझोत टाकला तसेच साईमत समाचारचे संपादक गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर प्रशासनाला धारेवर धरून रस्त्यावर मुरूम टाकण्यास भाग पाडले असून आज सकाळपासून रस्त्याच्या खड्ड्यावर मुरूम टाकण्याची मोहिम नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे.या मोहिमेमुळे बाहेरपुरा रहिवाशांच्या मागणीला यश आले आहे.


शहरातील बाहेरपुरा भागातील नागरिक गटारी व खराब रस्त्यामुळे खूप वैतागले आहे.या भागातील नगरसेवकांनीसुद्धा गेल्या पाच वर्षात गटारी आणि रस्त्याचे काम करू शकले नाही, याबाबत नागरिक खंत व्यक्त करीत होते.शहरातील बाहेरपुरा भागात कामगार कल्याण केंद्रापासून तर पंचमुखी हनुमान चौक व परधाडे रोड या भागात रस्त्यावर वाहन चालवणे मुष्किल होईल इतके मोठमोठे खड्डे पडलेले आहे. काही भागात गटारीसुद्धा बांधण्यात आलेल्या नाहीत. तसेच या भागात गटारी काढण्यासाठी 15-15 दिवस नगरपालिकेचे कर्मचारी येत नाही,फवारणी मारणारे येत नाही.यामुळे डास- मच्छर यांचे खुप  प्रमाण वाढले आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अनेकांच्या घरात  कुणी ना कुणी आजारी पडले आहे.या भागात आ.किशोर पाटील यांनी विकासाच्या नावावर मतदान घेतले आहे.निवडणुकीत जो विश्वास दाखवला होता,त्या विश्वासाने काहीही कामे केली नाही. संपूर्ण मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचे विकासकामे झाले आहेमग या भागात गेल्या 5 वर्षात रस्ते व गटारीच्या कामांचा काही विकास   का होऊ शकला नाही,असा  सवाल परिसरातील नागरिक उपस्थित  करीत होते. या प्रश्‍नी  काल सायंदैनिक साईमतने विशेष  प्रकाशझोत टाकून आवाज उठवला असता पाचोरा नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाल्याचे आज दिसून आले.

या प्रश्‍नी खड्डे मुरूम टाकून बुजले पाहिजेत पण त्या खड्ड्यांमध्ये मुरूमसुद्धा टाकायला नगरपालिकांकडे पैसे नसतील का? याबाबत माजी नगरसेवक प्रकाश एकनाथ चौधरी यांनी स्वत: अनेक महिला, पुरुषांच्या नागरिकांच्या सह्या घेऊन नगरपालिका प्रशासनाला लेखी स्वरूपात तक्रार केली होती. तरी सुद्धा नगरपालिकेने  दखल घेतली नाही.अखेर  साईमत मध्ये वृत्त येताच या भागातील रस्त्यावर आज सकाळपासून मुरुम टाकण्याच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात आली आहे.याबद्दल परिसरातील जनतेत समाधान व्यक्त केले जात असून …साईमत… ला सुध्दा धन्यवाद देण्यात य़ेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here