सा. बां. अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीला स्थगिती

0
20

सा. बां. अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीला स्थगिती

जळगांव (प्रतिनिधी)-

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या शासन आदेशानुसार हा स्थगितीचा निर्णय १५ एप्रिलपर्यंत लागू राहील.

प्रशांत सोनवणे यांची जळगांव येथील सार्वजनिक बांधकाम मंडळातून नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली होती. हा आदेश १८ मार्चरोजी जारी करण्यात आला होता. मात्र, नव्या शासन आदेशान्वये (क्र. बदली-१२२४/प्र.क्र.९१/सेवा-१, दि. १८.०३.२०२५) ही बदली तात्पुरती स्थगित करण्यात आली आली आहे.

शासनाने स्पष्ट केले की, हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०३२७१११२१२९६१८ आहे व डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आला आहे.

हा निर्णय राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि अवर सचिव द. व. खारके यांच्या नावाने जारी करण्यात आला आहे. या स्थगितीमुळे प्रशांत सोनवणे हे सध्या जळगांव येथेच पर्वीच्या पदावर कार्यरत राहतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here