साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
रिपाई आठवले गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये पाचोरा तालुकाध्यक्ष विनोद अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुक्याची बैठक हुतात्मा स्मारक याठिकाणी घेण्यात आली. बैठकीत गाव तेथे शाखा आणि म.फुले, राजर्षी शाहू, डॉ.आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांचे विचार गावोगावी पोहोचविण्याचे काम सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते. पदाधिकारी यांनी करावे, अशी संकल्पना करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
बैठकीत नूतन पदाधिकारी म्हणून कार्याध्यक्ष गुरुदास भालेराव, तालुका सचिव रमेश सुरवाडे, पिंपळगाव गटाचे विभागीय अध्यक्ष संदीप चव्हाण, तालुका उपाध्यक्ष रामदास गायकवाड, शहर उपाध्यक्ष प्रकाश भीवसने, महिला आघाडी पाचोरा प्रियंका सोनवणे, खडकदेवळा संतोष गायकवाड, दहिगावचे माजी सरपंच सुनील जावळे, पाचोरा मोची समाज संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन जाधव, पुणगावचे गणेश सुरवाडे, मुकेश जाधव, रामसिंग चव्हाण पुनगाव आणि भैय्या बागवान यांना युवा तालुकाध्यक्ष पद देण्यात आले.