गोरक्षनाथ महाराज यात्रेनिमीत्त धामणगांवात कुस्त्यांची दंगल

0
42

साईमत, धुळे : प्रतिनिधी
तालुक्यातील धामणगांव येथे सालाबादाप्रमाणे तिथीनुसार श्रावण महिन्यात पोर्णिमेच्या एक दिवस अगोदर गोरक्षनाथ महाराजांची यात्रा भरते. या यात्रा महोत्सवानिमीत्त दि.29 ऑगस्ट रोजी विराट कुस्त्यांच्या सामान्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कुस्त्यांच्या सामनांचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे भाजपा युवानेते तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांच्याहस्ते पहिली मानाची कुस्ती लावून करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.धुळे तालुक्यातील धामणगांव येथे गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमीत अनेक वर्षापासून कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. ह्या कुस्त्यांसाठी व्ोल्हाणे, सावळीतांडा, बोरकुंड, शिरुडसह धुळे व जळगांव, मालेगांव जिल्ह्यातून पहेलवान (कुस्तीगीर) आलेले होते. सदर कुस्तींचा सामाना बघण्यासाठी धामणगांव पंचक्रोषीतील व धुळे तालुक्यातील कुस्तीशकिनांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. याप्रसंगी जि.प.सदस्य राम भदाणे यांनी उपस्थितीत कुस्तीविरांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन करतांना म्हणाले, हा खेळ फार पूर्र्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त््‌‍वाची असते. नियमीत कुस्ती खेळून वा व्यायाम करुन एखादा जगज्जेदा होईलच असे नसले तरी खेळ व्यायाम म्हणून खेळला तर यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो. व कॉलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होंते. म्हणून या मैदानी खेळाचे फार महत्व आहे. कुस्तीचा हा खेळ आरोग्य निरामय ठेवण्यासाठी कुस्तीचा नियमीत सराव करावा, असे त्यांनी याव्ोळी उपस्थित कुस्तीगीरांना संबोधतांना सांगितले. तसेच या मातीतील खेळाचे प्रबोधन करुन याची व्याप्ती वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्नशील रहाव्ो असेही त्यांनी याव्ोळी सांगितले. याप्रसंगी गुलाब पहेलवान, वासुदेव पाटील, रतन दादाभाऊ यांच्यासह धामणगांव व पंचक्रोषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा उत्सवानिमीत्त रंगलेल्या कुस्तींच्या सामन्याच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धामणगांव येथील ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, भटू पाटील, प्रशांत पाटील, रुपेश फौजी, उमाकांत पाटील, विजय पाटील, परशु पहेलवान यांच्यासह कार्यर्त्यांनी प्रयत्न केलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here