साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील विश्वासराव पवार ट्रस्ट नगरदेवळा संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली, पाचोरा शाळेचा यंदाचा दहावीचा निकाल ९८.६१ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या ७२ पैकी ७१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींपैकी २१ मुली गुणवत्ता यादीत, ३५ मुली प्रथम श्रेणीत, १३ मुली द्वितीय श्रेणीत तर दोन विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.
पाचोरा येथील माध्यमिक कन्या विद्यालयातून गुणवत्ता क्रमांकानुसार प्रथम पाच आलेल्या विद्यार्थिनींमध्ये रोशनी अंगद पाटील (८८.८०), प्रेरणा सुनील वाबळे ( ८४.४०), हुमेरा जहुर खाटीक (८४), धनश्री बन्सीलाल पवार (८२.८०), धनश्री संजय वाडेकर (८२.२०), तनुजा कैलास दराडे (८२.२०) यांचा समावेश आहे. घवघवीत यशाबद्दल विश्वासराव पवार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराव पवार, सचिव रूपाली जाधव यांनी शाळेचे सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनी, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक यांचे कौतुक केले आहे.