पाळधी महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धेला प्रतिसाद

0
31

स्पर्धेत सामाजिक समस्यांवर आधारित रांगोळींचा सहभाग

साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :

येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘स्वच्छता ही सेवा’- २०२४ ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ मोहिमेच्या संकल्पनेवर आधारित भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. रांगोळी स्पर्धेचा मुळ विषय जरी स्वच्छतेवर आधारित असला तरी या रांगोळी स्पर्धेत स्त्री भ्रूणहत्या, बदलापूर घटना, आत्मनिर्भर भारत आणि स्त्री सशक्तीकरण अशा अनेक वैश्विक आणि राष्ट्रीय, सामाजिक समस्यांवर आधारित रांगोळींचा स्पर्धेत सहभाग होता.

संबंधित सर्व रांगोळीचे परीक्षण केल्यानंतर परीक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकात विभाजन करत त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका मृणाल काळे, रोशनी चौधरी व माध्यमिक विद्यालयाच्या अनिता पाटील, जयश्री कोळी व महाविद्यालयातील प्रा. तृप्ती जैन परीक्षक म्हणून लाभल्या होत्या.

कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रासेयोचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, संस्थाध्यक्ष प्रतापराव पाटील, विक्रमराव पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.कंखरे, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियमचे प्राचार्य नरेंद्र मांडगे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय बाविस्कर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी श्रावणे यांच्यासह संपूर्ण प्राध्यापक उपस्थित होते.

रासेयोच्या स्वयंसेवकांशी साधला संवाद

यावेळी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रासेयोचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी महाविद्यालयातील सर्व रासेयोच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला.त्यांना रासेयोचे महत्व आणि गरज युवकांसाठी आणि देशासाठी किती आहे, असे त्यांना समजून सांगितले. त्याचबरोबर संस्थाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सूत्रसंचालन रासेयोचे स्वंयसेवक दिनेश सोनवणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here