तरवाडे बुद्रुकला शेतीशाळेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद

0
5

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे कृषी विभाग व राशी सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण कामगंध सापळे तसेच राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी प्रकल्प अंतर्गत नुकतीच शेतीशाळा घेण्यात आली. यासंदर्भात कृषी सहाय्यक एम.एस.देवरे, राशी सीड्स प्रतिनिधी दीपक जाधव यांनी सविस्तर माहिती माहिती दिली.

याप्रसंगी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण, व्यवस्थापन, कामगंध सापळे, उपयोग तसेच निमार्कबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला गावातील सर्व शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेऊन चांगला प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here