Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»Responding To Samata Dindi : धुळ्यात सामाजिक न्याय दिनानिमित्त समतेचा संदेश देत समता दिंडीला प्रतिसाद
    धुळे

    Responding To Samata Dindi : धुळ्यात सामाजिक न्याय दिनानिमित्त समतेचा संदेश देत समता दिंडीला प्रतिसाद

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 27, 2025Updated:June 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संविधानाच्या उद्देशिकेचे केले सामूहिक वाचन

    साईमत/धुळे/प्रतिनिधी :

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून समाजकल्याण विभागामार्फत काढण्यात आलेल्या समतेचा संदेश देणाऱ्या समता दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर तसेच मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून समता दिंडीची सुरुवात करण्यात आली. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

    यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोक अभिरक्षक ॲड. ज्ञानेश्वर महाजन, इमाव बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक अश्विनी मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार विजेते तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जिरेकर, जोसेफ मलबार, सुरेश बहाळकर, सुरेश लोंढे, श्रीमती नंदिनी सौंदाणकर, मधुकर शिरसाठ, सुभाष कुलकर्णी, शाहिर श्रावण लक्ष्मण वाणी, रामदास जगताप, निवृत्त समाज कल्याण अधिकारी विलास कर्डक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

    समता दिंडीत विद्यार्थ्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, सामाजिक न्याय आणि समतेसाठी संघर्ष केला पाहिजे, संविधानाने दिला अधिकार, शिक्षणाचा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा, शिक्षण ही स्त्री आणि पुरुषांची प्राथमिक गरज आहे, सारे बांधव मानू समान, भारत देश होईल महान, अडाणी राहू नका, मुला बाळांना शिकवा तसेच व्यसनमुक्तीवरील उद्घोषणा देत समतेचा संदेश दिंडीत दिला. तसेच दिंडीच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्याबाबत जनजागृती करण्यात येवून सामाजिक न्यायाचे महत्व पटवून देण्यात आले.

    समता दिंडीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सुंदर अशी प्रतिमा ठेवलेला चित्ररथाद्वारे समता दिंडींची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होऊन प्रशासकीय संकुल, जिजामाता हायस्कूल, झाशी राणी पुतळा, जुनी महानगरपालिका, महाराणा प्रताप पुतळा, फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा, नगरपट्टी (पाटबाजार), गल्ली नं. ४ (बँक ऑफ महाराष्ट्र), खोलगल्ली, सीमा हँडलुम, पारोळा रोड, कराचीवाला खुंट, जुनी महानगरपालिका, नवीन महानगरपालिका, कमलाबाई हायस्कूल चौक, जुने सिव्हिल हॉस्पिटल, संतोषी माता मंदिराजवळील गुलमोहर विश्रामगृह धुळे आवार येथे व्यसनमुक्तीबाबत शपथ घेवून दिंडीचा समारोप करण्यात आला.

    समता दिंडीत अनेकांनी घेतला सहभाग

    समता दिंडीत परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, धुळे, जो.रा.सिटी हायस्कुल, ॲग्लो उर्दू हायस्कुल, कमलाबाई कन्या हायस्कुल, कै. वसंतराव यशवंतराव घासकडबी महाविद्यालय, धुळे येथील विद्यार्थी व विद्यार्थींनी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी सहायक लेखाधिकारी योगेश चौधरी, गृहपाल मनोज पाटील, किरण साळुंके तसेच समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा कलामहोत्सव; आमदार भदाणेंचे आवाहन

    December 30, 2025

    Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’तून एकतेचा संदेश; धुळेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

    October 31, 2025

    Dondaicha Case: दोंडाईचा येथील प्रकरण : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या शेतजमिनीवर रावल कुटुंबियांचा कब्जा

    September 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.