Shindkheda Taluka: शिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण नव्याने निघणार, ३० जुनला सोडत

0
5

डिसेंबर २४, मार्च २५ रोजीचे निघालेले सरपंच पदाचे आरक्षण रद्द

साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी :

तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ३० जून रोजी अकरा वाजता नव्याने आरक्षण सोडत शिंदखेडा तहसील कार्यालयात होणार असल्याचे तहसीलदार अनिल गवांदे यांनी सांगितले. ग्रामविकास विभाग यांच्याकडे ५ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, यापूर्वी शिंदखेडा तालुक्यात मार्च २०२५ मध्ये १०० ग्रामपंचायतींच्या २०२५-२०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आली होती. पेसाव्यतिरिक्त असलेल्या १२३ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीकरिता ७ ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीकरिता २६ ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता ३३ ग्रामपंचायती तर उर्वरित ५७ पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित केली होती.

ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई, यांच्याकडील १३ जून २०२५ रोजीच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार, यापूर्वी घेण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडील १७ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार, शिंदखेडा तालुक्यातील २०२५-२०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १२३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा ३० जून रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय शिंदखेडा येथे आयोजित केली आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन

सुधारित आरक्षणानुसार, पेसाव्यतिरिक्त असलेल्या १२३ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीकरिता ७ ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीकरिता २६ ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता ३३ग्रामपंचायती तर उर्वरित ५७ पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात येणार आहेत. आरक्षण सोडत सभेसाठी तालुक्यातील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांनी उपस्थित राहण्याबाबत अनिल गवांदे यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here