
सुवर्णकार समाज व राजमुद्रा ग्रुपतर्फे निषेध करण्यात येऊन नराधमास फाशीची शिक्षा द्यावी
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : –
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अमानुष अत्याचर करून तिचा निर्घृण खून केल्याच्या घटनेचा सुवर्णकार समाज व राजमुद्रा ग्रुपतर्फे निषेध करण्यात येऊन नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
काही दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील रहिवासी कु.यज्ञा जगदीश दुसाने (वय 3) या निष्पाप निरागस बालिकेवर एका नराधमाने अमानुष् अत्याचार करून अतिशय निर्घृणपणे हत्या केली. या राक्षसी कृत्याचा फैजपूर शहरातील सुवर्णकार समाज व राजमुद्रा ग्रुपतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध लावून या नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडित बालिकेला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयातील स्टेनो योगिता गोरडे यांना दिले.
यावेळी विंध्यावासिनी माता मंदिरचे अध्यक्ष संदीप दुसाने, किरण मोरे, सचिन दुसाने, पंकज मोरे, दीपक दुसाने, सचिन विसपुते, देवेंद्र विसपुते, सुजित गलवाडे, अमित जयस्वाल, शुभम जयस्वाल, वीरेंद्र जैन, तुषार शेटे यांच्यासह राजमुद्रा ग्रुप व सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


