जळगावसह धरणगाव तालुक्यातील भजनी मंडळांना तीन टप्प्यात 177 साहित्याचे वाटप
साईमत/न्यूज नेटवर्क/पाळधी, ता. धरणगाव :
पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी चार हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करत राहणार आहे. संत कार्यासाठी सदैव झटत राहणार आहे. ‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान’ हे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रतर्फे आयोजित भजनी मंडळ साहित्याच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. अत्यंत शिस्तबद्ध, अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते धरणगावसह जळगाव तालुक्यातील 79 भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय वारकरी भवन उभारण्याचा मानस पूर्ण होत असल्याने त्याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगितले. वारकरी संप्रदाय वाढीसाठी व जनसामान्याच्या कार्यासाठी नेहमीच कटिब्ध्द राहील, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे विविध कार्यक्रमाच्या माऊलींच्या हरिनामाचा गजरासाठी भजनी मंडळ साहित्याची खूप गरज असते. हीच गरज ओळखुन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 57, दुसऱ्या टप्प्यात 41 आणि तिसऱ्या टप्प्यात 79 असे 177 गावांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले.
‘गुलाबभाऊ’ राजकारणात परमार्थ रुजविणारे नेतृत्व
: ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर
तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम वारकरी करीत असतो. ‘गुलाबभाऊंच्या’ माध्यमातून खान्देशाला उज्ज्वल नेतृत्व लाभले आहे. अशा साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात टाळ, मृदृगाचा आवाजाचे पुण्य गुलाबभाऊंना लाभत आहे. ते म्हणजे राजकारणात परमार्थ रुजविणारे नेतृत्व असल्याचे मत श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रचे अध्यक्ष तथा गौप्रेमी ह.भ.प.गजानन महाराज यांनी व्यक्त केले.
वारकरी सांप्रदायाला सदैव सहकार्य राहणार
संतांचा वारसा टिकविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. त्यांना सहकार्य म्हणून तीन टप्यात आतापर्यंत 177 भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वारकरी सांप्रदायाला सदैव सहकार्य राहणार असल्याची ग्वाही प्रास्ताविकात माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन ह.भ.प. प्रा.सी.एस.पाटील तर आभार सुशील महाराज, विटनेरकर यांनी मानले.
यांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमाला ह.भ.प. चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवरकर, ह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, कैलास महाराज चोपडाईकर, ह. भ.प. बाबा हंस महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, शाळेचे चेअरमन विक्रम पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, अर्जुन पाटील, शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, दिलीप आगीवाल, मा. सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, रवींद्र चव्हाण, सचिन पवार, कैलास पाटील, भरत बोरसे, गजानन पाटील, दूध संघाचे रमेश आप्पा पाटील, जितू पाटील, राजू पाटील, स्वप्नील परदेशी, भानुदास विसावे, परिसरातील सरपंच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच , वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य उपस्थित होते.