साईमत धुळे प्रतिनिधी
येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ४६ लाख रुपये खर्चाची जामफळ धरणातून तात्पुरती योजना कार्यान्वित झाली असून, पाणीटंचाईतून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजनेचे नारळ वाढवून उद्घाटन प्रभारी सरपंच सविता पाटील यांनी केले.
येधे जामफळ धरणातून पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ती पूर्णत्वास येण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार असल्याने तात्पुरती योजना पूर्ण करण्यास आली.सध्या येथे दहा दिवसांआड पाणी मिळते. जामफळ प्रकल्पाच्या कामात दोनपैकी एक जलवाहिनी तोडण्यात आली, तसेच कूपनलिकेचे स्रोत आटल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली. ती टंचाई आजही कायम आहे. मात्र आजपासून तात्पुरत्या योजनेचे पाणी मिळण्यास सुरवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
योजनेसाठी भाजपचे प्रा. अरविंद जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी सहकार्य केले. सरपंच प्रतिनिधी समाधान पाटील, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आर. के. माळी व ग्रामपंचायत सदस्यांनी मंजुरीसाठी पाठपुरावा केला. सुमारे चार किलोमीटर जलवाहिनी व दोन २५ अश्वशक्तीचे वीजपंप पूर्वीच्याच विहिरीत बसविले आहेत.या वेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, समाधान पाटील, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ खान पठाण, शफियोद्दीन पठाण, मुन्ना शेख, विशाल कासार, लखन ठेलारी, पिंटू भिल, इरफान पठाण, श्याम माळी, राजेंद्र जाधव, धाकू बडगुजर, हाजी अल्ताफ कुरेशी, मोहनसिंग परदेशी, उमेश पाटील, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.गावातील प्रत्येक भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा म्हणून वेगवेगळे ११० हून अधिक टप्पे आहेत. तसेच तीन ते सहा इंच व्यासाच्या जलवाहिन्यांमुळे कितीही पाण्याची उपलब्धता असली तरी किमान सात दिवसांआड पाणी मिळते. या पार्श्वभूमीवर जामफळ प्रकल्पाच्या वायव्येकडील चांदगड गावाच्या दिशेला विहीर खोदली जात असून, तेथून जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीद्वारे गावात पाणीपुरवठा केला जाणार आहे. येथे आता दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी मिळणार आहे. गावातील जमिनींतर्गत जलवाहिनी बदलण्यात येणार असून, संपूर्ण गावात दिवसाआड नळाद्वारे पाणी मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. गावातील जलवाहिनी बदलण्यासाठी आठ कोटी व विहीर व इतर कामासाठी नऊ कोटी रुपये खर्च मंजूर झाला आहे.