‘फोन टॅिंपग’ प्रकरणात रश्मी शुक्लांना दिलासा

0
14

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

राज्यात गाजलेल्या नेत्यांच्या फोन टॅिंपग प्रकरणी रश्मी शुक्लांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, शासनाने रश्मी शुक्ला यांच्या बाबतचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. रश्मी शुक्ला तुमच्या आश्रयाला आल्या म्हणून त्यांना भाजपच्या वॉिंशग मशिनकडून दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे सरकारने रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. माझा फोन टॅप केला, त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना अधिव्ोशनातून प्रश्न विचारला, मात्र त्याचे उत्तर मला मिळाले नाही. वास्तविक अजूनही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नसतानाही सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला. उलट रश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळाली. आमचे म्हणणे न ऐकता आणि आम्हाला उत्तर न देता सरकारने परस्पर क्लोजर रिपोर्ट सादर केला. रश्मी शुक्लांना मात्र निर्दोष केले. एकनाथ खडसेंचा क्लोजर रिपोर्ट गृहमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. मग तो क्लोजर रिपोर्ट सुद्धा कोर्टाला स्वीकारायला लावा, उलट चौकशी का लावतात? असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे.

प्रकरण काय?
भाजपला धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची स्थापन केली होती. याच दरम्यान आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, हे फोन टॅिंपग प्रकरण राज्यात चांगलंच गाजले. फोन टॅिंपग प्रकरणात रश्मी शुक्ला वादग्रस्त ठरल्या होत्या. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने फोन टॅिंपग प्रकरण कायमचे बंद झाले आहे. फोन टॅिंपग प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅिंपग केल्याच्या आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here