
साईमत बोदवड प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे जळगाव जिल्ह्यातील बर्याच तालुक्यात पेरणी योग्य पाऊस पडला आहे परतु बोदवड तालुक्यात अद्यापही पाउस नाही जवळपास १००%धुळ पेरनी पूर्ण झाली आहे परंतु शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे. दराम्यान, बोदवड परिसरात शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट उभे ठाकले असून बळीराजा हवालदिल झाला आहे.
कायम स्वरूपी दुष्काळ ग्रस्त असलेल्या तालुक्यात वरुण राजाने सुद्धा पाठ फिरवली कि काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर असुन, पिण्यास सुद्धा पाणी मिळत नाही गुराढोराना चारा नाही शेतमजूराच्या हाताला काम नाही बाजार पेठ सुन्न असून शेतकरी चिंताग्रस्त आहे .
शेतकरी नाना पाटील यानी सागीतले की, बोदवड परिसर सिचन योजना पुर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या शेताला पाणी व मुजुराच्या हाताला काम मिळेल बोदवड परिसर सिंचन योजना पुर्ण होण्याची सत्ताधारी विरोधी यानी निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे परतु आमचे नेते एकमेकावर आरोप करण्यात धन्यता मानतात बळीराजा लवकर बरसावा हिच शेतकरी वर्गात चर्चा आहे.


