संस्कृत सप्ताह निमित्त रंगला गप्पांचा कार्यक्रम

0
32

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडा येथे संस्कृतदिना निमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतसप्ताह पाळण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत गप्पांचा कार्यक्रम चागांलाच रंगला होता.

या संस्कृतसप्ताहासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या संस्कृत गप्पांच्या कार्यक्रमात प्राध्यापक डॉ.अखिलेश शर्मा यांच्याशी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अस्खलित संस्कृत भाषेत संवाद साधला. यात शैक्षणिक, राजकीय, चंद्रयान, आदित्य एल., संस्कृत वाङ्मय, संस्कृत काव्य, व्याकरण अश्या वेगवेगळ्या विषयावर सरांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच संस्कृत विषयाचे ज्ञान वाढविण्यासाठी आणि गुणवत्तेसाठी कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा असतात यावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची सरांनी त्यांच्या दिलखुलास शैलीत समर्पक उत्तरे देवून समाधान केले. शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक, आभार नंदिनी टाकणे यांनी मानले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ शिक्षक जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख म्हणून सुरेखा शिवरामे-बाणाईत, नंदिनी टाकणे, अनिता शर्मा यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here