पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी शिफारस दिल्याने निवड
साईमत/जालना/प्रतिनिधी :
“महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान” ह्या राज्यस्तरीय सांस्कृतिक संस्थेचे राज्य उपाध्यक्ष राम घोडके यांची जालना जिल्ह्याच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत आणि साहित्यिक मानधन निवड समितीवर पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी शिफारस दिल्याने त्यांची निवड समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
गेल्या ३० वर्षापासून ते लोक-कलावंतांच्या प्रश्नांसाठी झगडत आहेत. उपोषण, मोर्चा व आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जालना जिल्ह्यातील अनेक कलावंतांना तसेच दिवंगत कलावंतांच्या पत्नीस न्याय मिळवून दिला आहे. संस्थेचे जालना जिल्हाध्यक्ष म्हणून सुमारे २५ वर्ष त्यांनी कार्य केले. ते या वयातही सक्रिय आहेत.
त्यांची सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे संस्थाध्यक्ष शाहीर सुरेशचंद्र आहेर, सरचिटणीस अशोक भालेराव,अनिल मनोहर,संपत खैरे, मल्हारी खेडकर, श्रीकांत गायकवाड, मनोहर नेटावटे, जालना जिल्हा पदाधिकारी सोनल वाघ, सुधाकर डहाळे, नारायण वाघमारे, अर्जुनराव करकरे, सुधाकर चिमणे, ज्ञानेश्वर जगताप, डॉ.चऱ्हाटे आदींनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.