Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पुणे पालिकेच्या भरधाव कचरा गाडीने दोघाना चिरडलं
    क्राईम

    पुणे पालिकेच्या भरधाव कचरा गाडीने दोघाना चिरडलं

    SaimatBy SaimatAugust 7, 2022Updated:August 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी

    पुणे गेल्या 24 तासांच्या आत चार दुचाकीस्वारांनी (Pune Biker died) जीव गमावला आहे. पुणे शनिवारी झालेल्या अपघाताच्या दोन घटनांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण चार दुचाकीस्वारांचा बळी गेला. यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. पहिल्या घटनेत झाड पडून दोघा बाईकस्वारांचा जागीच जीव गेला होता. तर दुसरी घटना घडली पुणे महापालिकेच्या (PMC 2022) टर्फ क्लब चौकाच्या हद्दीत. पुणे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने दुचाकीला धडक दिली. भरधाव कचऱ्याची गाडी (PMC Garbage Vehicle) दुचाकीला धडकली आणि यात दुचाकीवरील दोघेही जण दूरवर फेकले गेले. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. हे दोघेही दुचाकीस्वार हे मूळचे अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा येथील असल्याची माहितीही समोर आली आहे. तर भरधाव वेगाने आणि अत्यंत बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन घेत त्याला अटकही करण्यात आली आहे.

    वानवडीत अपघात
    पुणे महापालिकेच्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकने वानवडीतील टर्फ क्लब चौकात दुचाकीला धडक दिली. भरधाव ट्रकची धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील दोघेही जण डिव्हायरच्या दिशेने फेकले गेले. यात दोघांनाही गंभीर जखम झाली. दुचाकीवर एक जण जवान असून त्याचं नाव हनुमंत दगडू काळे आहे. ते 43 वर्षांचे होते. तर त्यांच्यासोबत दत्त पोपट काळे हे देखील निघाले होते. त्यांचं वय 40 असून ते दोघेही जण श्रींगोद्यातील आढळगाव इथले रहिवासी होती. ते कामानिमित्त पुण्यात आले असता त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि यात त्या दोघांचाही जीव गेला.

    जवानाला चिरडलं
    हनुमंत काळे हे उत्तराखंडमध्ये सैन्य दलात कर्तव्यावर असून ते सुट्टीनिमित्त घरी परतले होते. मूळगावी आले असता काही कामानिमित्त ते दुचाकीवरुन पुण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या अपघातात हनुमंत काळे यांच्यासह दत्त पोपट काळे यांचाही मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.