पाचोऱ्यात एड्स दिनानिमित्त केली जनजागृती

0
9

रॅलीत जागतिक एड्स दिनाचे महत्व, एचआयव्ही एड्सविषयी दिली माहिती

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी 

येथील आयसीटीसी विभाग ग्रामीण रुग्णालय, साईनाथ सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय आणि डॉ.वाय.पी.युवा फाउंडेशन, एन.जी.ओ. खडकदेवळा बु., गो.से.हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही एड्स जनजागृतीपर अभियान रॅली काढण्यात आली.

ही रॅली पाचोरा ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज, भाजी मंडई इतर भागातून काढण्यात आली. रॅलीत गो.से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीत एच.आय.व्ही.एड्स जनजागृतीपर जागतिक एड्स दिनाचे महत्व, एचआयव्ही म्हणजे काय? एचआयव्ही व एड्स यातील फरक, एचआयव्ही होण्याची प्रमुख कारणे कोणती? विशेष घाव्याची काळजी, समाजातील गैरसमज, उपचार व एचआयव्ही बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व मुद्यांवर ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक श्रीमती लता चव्हाण व प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकांत भोई यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व उपस्थितांनी शपथ घेतली. कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी जळगाव, वैद्यकिय अधिक्षक डॉ.सतिष टाक यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयातील डॉ.अमित साळुंखे, डॉ.विजय पाटील, डॉ.तेली, डॉ.सोनवणे, डॉ.शेख, डॉ.नानकर, डॉ.भावसार व सर्व कर्मचारी,गो.से.हायस्कूलमधील शिक्षक आर.एन.ठाकरे, एल. टी.पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here