Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना विशेष मदत द्या
    कृषी

    चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना विशेष मदत द्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 29, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

    चक्रीवादळ व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना विशेष मदत मिळावी, शहर पोलीस स्टेशनच्या मुख्य इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा. तसेच विश्रामगृह बीओटी तत्त्वावर निर्मितीस मंजुरात द्यावी, अशा महत्त्वपूर्ण मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आ.राजेश एकडे यांनी २९ मे रोजी बुलढाणा येथे केल्या आहे.

    मलकापूर मतदार संघात २६ मे २०२४ रोजी मलकापूर व नांदुरा शहरांसह तालुक्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा तडाखा बसला आहे. या भागाची पाहणी केली आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे. घरावरील टिनपत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरातील धान्य, जीवनावश्‍यक वस्तू वादळामध्ये उडून गेल्या आहेत. तसेच जनावरांच्या गोठ्यावरील टिनपत्रे, चारा यासह शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झाडे उन्मळून विद्युत तारांवर पडल्याने १ हजार विद्युत पोल क्षतीग्रस्त झाले आहेत. तसेच विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने जनावरांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने जनावरे मृत आहेत. अजुनही अनेक गावे अंधारात आहेत. चक्रीवादळ व अवकाळी पावसाने मलकापूर तालुक्यातील रवींद्र विक्रम निकम, निवृत्ती गन्साराम इंगळे हे मयत पावले आहेत. तसेच १५ जनावरे दगावली आहे. ११० घरांचे पुर्णतः तर २ हजार २८६ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच आतापर्यंतच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार नांदुरा तालुक्यातील ५०० घरे अंशतः बाधीत झाले आहे. १२ गावे पुर्णतः बाधित झाली आहेत. तसेच जनावरेही दगावलेली आहेत. महसूल विभागाकडून अद्यापही पंचनामे सुरु आहेत. यामध्ये नुकसानग्रस्तांच्या संख्येत अजुनही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चक्रीवादळ व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना आपणाकडून विशेष मदत देण्यात यावी. पोलीस स्टेशन मलकापूर शहर मुख्य इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा.

    वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पोलीस अधीक्षक, इमारतीची टिनपत्रे उडाली आहेत. बुलढाणा यांच्या अधिपत्याखालील शहर पोलीस स्टेशनच्या मुख्य दैनंदिन कामकाज ताडपत्रीचे तंबु उभारुन त्यातून सुरु आहे. यापूर्वीही मलकापूर शहर पोलीस स्टेशन इमारत व शासकीय निवासस्थान बांधकामाबाबत शासनाकडे सतत पाठपुरावा केलेला आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशन हे अतिशय संवेदनशील आहे. या इमारतीचे बांधकाम इंग्रजकालीन आहे. इमारत शिकस्त झाल्याने पुर्णतः पडझड झालेली आहे. इमारत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचे झालेल्या वादळामुळे दिसून आले आहे. अशा परिस्थितीतही पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुन त्याठिकाणी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मलकापूर शहर पोलीस स्टेशन इमारत बांधकामासाठी १५ कोटी रुपये मंजुर करण्यात यावेत. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मलकापूर विश्रामगृहाच्या इमारतीवरील टिनपत्रे पुर्णपणे उडून गेली आहेत. इमारतीची पडझड झाली आहे.

    मलकापूर हे विदर्भाचे प्रवेशद्वार असुन याठिकाणी व्यापारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांची नेहमी ये-जा असते. त्यांच्या निवासाकरीता विश्रामगृह महत्त्वाचे आहे. अस्तित्वातील विश्रामगृहाची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी शहराच्या मध्यभागी आहे. व्यावसायिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. याठिकाणी बीओटी तत्त्वावर बांधकाम केल्यास शासनास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे. नवीन आताच्या दरानुसार प्रस्ताव मागविण्यात येवून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मंजुर करण्यात यावा, अशा तीन महत्त्वपूर्ण मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आ.राजेश एकडे यांनी केल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Malkapur : मलकापूरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

    January 31, 2026

    Malkapur:मलकापूरला धक्का व्यवसायिक ऑटोचालकाचा रस्त्यावर निर्घृण खून

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.