साईमत, बोदवड : प्रतिनिधी
मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यात शनिवारी, २५ मे रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहे. शेती शिवार आणि घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे रविवारी, २६ मे रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा, चिंचखेडा सीम, लहान मनुर, ऐणगाव, चिखली येथे नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांना धीर देऊन नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासंबंधी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली.तसेच आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रामदास पाटील, कैलास चौधरी, चिंचखेडा सीमचे सरपंच पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, विनोद कोळी, रामराव पाटील, किरण वंजारी, शाम सोनवणे, नईम बागवान, अतुल पाटील, दिलीप पाटील, शिरसाळाचे सरपंच शांताराम बोरसे, प्रवीण पाटील, अमोल बोरसे, प्रकाश पाटील, दीपक किनगे, महेंद्र बोंडे, आकाश प्रकाश पाटील, राजू फिरके, सुरेश तिडके, पराग फिरके, प्रबोध पाटील, मनुरचे सरपंच अमोल हळपे, सुरेश धनगर, चिखलीचे सरपंच धनराज पाटील, अमोल सोनवणे, विकास पाटील, प्रकाश वाघ, लीना वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.