ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्रासाठी जागासह निधी उपलब्ध करून द्या

0
60

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आ.किशोर पाटील यांना निवेदन

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

येथील माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेसाठी ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी शासनातर्फे जागा उपलब्ध करून त्या जागेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आ.किशोर पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देतांना माऊली बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजाराम सोनार, उपाध्यक्ष युवराज महाजन, सचिव कैलास महाजन, सहसचिव शांताराम चौधरी, खजिनदार नाना महाजन, संतोष पाटील, मन्साराम महाजन, छगन पाटील, आबा तुकाराम पाटील, चंदनसिंह तोमर, अरुण जोशी,रमेश मिस्त्री, सुनील झोपे, जगन महाजन, प्रकाश महाजन, गायकवाड आप्पा, सर्व सदस्य उपस्थित होते.

आ. किशोर आप्पांनी दिले आश्वासन

आमदार किशोर पाटील यांनी मनोगतात माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेला विरुंगुळा केंद्रासाठी जागा व बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here