महायुती सरकारच्या निषेधार्थ
हवेत सोडले ‘काळे फुगे’
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे ‘महायुतीचे काळे कारनामे’ असा निषेध कार्यक्रम गटनेते संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता.
यावेळी संजय वाघ यांनी राज्यात झालेली आर्थिक विकासाची घसरण, बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे संकट, कर्जमाफीचा उडालेला फज्जा, राज्यातील उद्योगांचे स्थलांतर, राज्यावर वाढते कर्ज दुष्काळावरील दुर्लक्ष, फसवी पीक योजना हे सगळे राज्य सरकारचे काळे कारनामे आहे. त्याचा निषेध करण्यात येत असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. तर राज्यात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या पक्षाचे खासदार, आमदार लोकसभा आणि राज्यसभा तसेच विधानसभा आणि विधानपरिषद जिवाचे रान करून प्रश्न मांडत असताना महायुतीचे विद्यमान खासदार आणि आमदार हे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यात मग्न असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून सांगितले. आंदोलनावेळी महायुती सरकारच्या निषेधार्थ काळे फुगे हवेत सोडण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पाचोरा शहराध्यक्ष अजहर खान, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष संदेश पाटील, रज्जू भाई बागवान, सत्तार पिंजारी, संजय एरंडे, वासुदेव महाजन, बशीर बागवान, सुरज वाघ, विनोद पाटील, सीताराम पाटील, दिलीप नागणे, किरण देवरे, ॲड.अविनाश सुतार, तारीक भाई, मोहम्मद भाई, हारुण देशमुख, शशिकांत पाटील, वसंत बाबुलाल, हेमराज सोनजी, बंटी महाजन, जनार्दन पाटील आदी उपस्थित होते.