शिवसेना उबाठा आक्रमक, टक्केवारी राज्य सरकारने राजीनामा द्यावा : वैशालीताई सूर्यवंशी
साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :
राज्य सरकारला फक्त टक्केवारीत रस असल्याने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली. ही घटना वेदनादायी आहे. अशा घटनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘सरकारने राजीनामा द्यावा’ अशा घोषणा दिल्या.
राज्य सरकारने आठ महिन्यापूर्वी उभारलेल्या ३५ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना ही घटना दुदैवी आणि निंदनीय आहे. राज्य सरकारला फक्त टक्केवारीत रस असल्याने कुठे पैसे खावेत आणि कुठे नाही हे त्यांना उमजत नाही. त्यातूनच शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बाब भयंकर आहे. त्यामुळे मराठी जन संतापले आहे. राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणीही वैशालीताई सूर्यवंशी यांनी केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अभय पाटील, हरीभाऊ पाटील, भरत खंडेलवाल, खंडू सोनवणे, पप्पू राजपूत, रसूलचाचा, पप्पू जाधव, गजू पाटील, गफ्फार शेख, गजानन सावंत, संदीप जैन यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.