कृषी पर्यवेक्षक के.एन.घोंगडे यांची पदोन्नती

0
51

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

पाचोरा कृषी विभाग आणि पाचोरा तालुका ड्रीप डीलर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी अधिकारी कार्यालयामधील कृषी पर्यवेक्षक के. एन. घोंगडे यांची जिल्हा बीज प्रमाणिकरण यंत्रणा, जळगाव येथे कृषी अधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहेे. याबद्दल त्यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव साहेब होते. यावेळी तालुका ड्रीप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, जळगाव जिल्हा ड्रीप डिलर असोसिएशनचे संचालक अतुल पाटील, कंपनी प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांसह वितरक उपस्थित होते.

के. एन. घोंगडे हे स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीविषयक शासकीय योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना योग्यरित्या समजावून सांगत होते. त्यामुळे त्याचा लाभ मिळवून देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल, याकडे त्यांचे नेहमी लक्ष राहत होते, असा सूर कार्यक्रमातून उमटला. त्यांच्या पदोन्नतीबद्ल लोहारा-कुऱ्हाड परिसरातील शेतकऱ्यांसह सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here