साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अनुलोमचे मार्गदर्शक ना.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व अनुलोमच्या वस्तीमित्रांना अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर प्रभू श्रीराम यांच्या पंचधातूच्या मूर्तीचे वितरण करण्यात येत आहे. लोहारा येथील अनुलोमचे वस्तीमित्र तथा लोहारा शहर पत्रकार मंचे अध्यक्ष दीपक पवार यांनाही सोमवारी, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्रीराम मंदिर, लोहारा येथे अनुलोमचे भागसेवक ईश्वर चौधरी, डॉ.सुभाष घोंगडे, शरद सोनार, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, उपसरपंच दीपक खरे, ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके, श्री स्वामी समर्थ केंद्राचे रामचंद्र काळे, माणुसकी समूहाचे गजानन क्षीरसागर यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले. यानंतर प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची श्रीराम मंदिर ते दीपक पवार यांच्या घरापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत विकासाचेे चेअरमन सुनील क्षीरसागर, प्रभाकर चौधरी, डॉ.बाळू जैन, संजय चौधरी, रमेश शेळके, प्रवीण चौधरी, रमेश लिंगायत, श्रीराम कलाल, रवींद्र कलाल, अनिल तडवी, विशाल पवार, ज्ञानेश्वर राजपूत, ज्ञानेश्वर चौधरी, स्थानमित्र महेंद्र घोंगडे, दिलीप चौधरी, चेतन विसपुते, सुनील खरे, शिवराम भडके, चंद्रकांत पाटील, महेंद्र पालीवाल, शरद कोळी, अतुल कोळी, समाधान नाथ, उमेश देशमुख यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, श्रीराम मंदिर समितीचे सदस्य, नागरिक, महिला सहभागी झाले होते.



