साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी
कोरोनाकाळाच्या दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुरू होणाऱ्या येथील खंडेराव महाराज मैदानात हळूहळू मनोरंजनाचे ( रहाट पाळणे, मौत का कुआ, ट्रेन, चक्री आदि) साहित्य घेऊन आगमन होत आहे.
येथील ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव मंगळवार २९ पासून सूरू होत आहे पांच दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे अश्व ( घोडा ) हा बारा गाडे ओढतो आणि चालत्या फिरत्या गाड्यांवर फिरणाऱ्या सोंडग्यांवर पिळदार चमचमणारे शरीर असलेले मल्हारमल्ल कसरती करतात आणि भंडारा आणि खोबऱ्याची उधळणीने होणारा सोनेरी परिसर हे असते त्यामुळे दोनशे अडीचशे वर्षाची परंपरा पाहण्यासाठी ओझर परिसरातील चाळीस वाडयावस्त्याचे ग्रामस्थ दृष्य डोळ्यात साठवून खंडेरावाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावतात.
यात्रोत्सवात चक्रीपासून रहाट पाळणा ते भूलभूलय्या मौंत का कुआ आदि मनोरंजनात्मक खेळांसाठी व अनेक दुकानदारांसाठी योग्य जागा मिळावी परिसर स्वच्छ रहावा यासाठी नगरपरिषद , कर्मचारी, यात्रा कमेटी यात्रेच्या पंधरा दिवस आधी परिश्रम घेऊन नियोजन केले जाते नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी यात्रा मैदान जेसीबी लाऊन बारागाडे ओढण्यासाठी पाटी तयार करण्याची तयारी सूरू केली आहे याच बरोबर यात्रा मैदानाची स्वच्छता सूरू करुन यात्रा मैदांन स्वच्छ केले आहे विविध व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसाया प्रमाणे जागा वाटप करण्यात येते. जागा वाटपाच्या जाचक अटी काढून निविदा पारदर्शक पध्दतीने म्हणजे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने काढण्यात याव्या, त्यातील जाचक अटी रद्द कराव्या व पुन्हा ही प्रक्रिया पुन्हा राबवावी अशी मागणी दिपक डोके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने नगरपरिपदेने काढलेली निविदाबाबत जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात याकडे जागा घेणाऱ्यांचे लक्ष लागून आहे. यात्रा करू व येणारे विक्रेते, दुकानदार यांना यात्रा मैदानात पाणी लाईट ब अनुषंगिक गरजा पुरवण्यासाठी नगर परिषद कर्मचारी ,यात्रा कमेटी परिश्रम घेत आहे.
या वर्षी खंडेराव महाराज मंदिरा समोरील महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाल्याने पुलाखाली या वर्षी मुबलक जागा मिळणार आहे. रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणा नियोजन करत आहे, यात्रा कमेटी अध्यक्ष धनंजय पगार , खजिनदार प्रशांत चौरे सहखजिनदार अशोकराव शेलार, युवराज शेळके, कार्याध्यक्ष रामचंद्र कदम पराग बोरसे, जि.प.सदस्य यतीन कदम, दिलीप कदम, भावका शिंदे, मोतीराम शेळके, बापू गवळी कार्यकारिणी सदस्य उमेश देशमुख, पराग बोरसे, भारत गाडेकर, भगवान भागवत, राजेंद्र बर्वे, सुनील गवळी, बाळासाहेब आहेर, भारत शेजवळ, नितीन पवार, नितीन जाधव, अनिल नवले, बापू चौधरी, राकेश जाधव, सचिन आढाव, संजय देवकर आदींसह बारागाडे मानकरी ग्रामस्थ यात्रा निर्विघ्नपारा पाडण्यासह बारा गाडे मानकरी नियोजन करत आहे. मानकरी आपआपल्या गाडयाची रंगरंगोटी व सजावट करत आहे.
यात्रेवर नियंत्रणासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 90 कर्मचारी नेमण्यात आले आहेत त्यात पोलिस मुख्यालयाचे 40 कर्मचारी 20 कर्मचारी जिल्हा वाहतूक शाखेचे वडीव-हे, पिंपळगाव बसवंत, घोटी, इगतपुरी पोलीस ठाण्यात तून 4 4 कर्मचारी तसेच दंगा नियत्रण पथक, बाहेरील 5 अधिकारी भुरट्या चोऱ्या व सोनसाखळी चोरांचा बंदोज करण्यासाठी साध्या वेशात ओझर पोलीस स्टेशनकडे गुन्हे शोध पथकातील पाच कर्मचारी तसेच एलसीबी शाखेचे पाच कर्मचारी असा बंदोबस्त पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आला आहे.