पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना प्राधान्य

0
28

साईमत, नाशिक । प्रतिनिधी

प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीला प्राधान्य न देता पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी बुकिंगनुसार मूर्तीकारांनी काम सुरू केले आहे. शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी साधारण आठ दिवसांचा कालावधी लागतो. गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने मूर्तीकार शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी सज्ज झाले आहेत. शाडूच्या मूर्तीच्या किमती १८० ते तीनशे रुपयांपर्यंत असून, ५० रुपयांची वाढ झाली आहे. मूर्तीवर सोनेरी व स्कीन कलर सर्वाधिक वापरला जातो. रंगांच्या किमतीतही दुप्पट वाढ झाली आहे. नऊ इंचांपासून ते अडीच फुटांपर्यंत गणेशमूर्ती बनविल्या जात असून, दहा हजारांपर्यंत मूर्तीच्या किमती आहेत.

घरगुती विसर्जन करणाऱ्यांकडून शाडूच्या मूर्तीला प्राधान्य दिले जात असले तरी पीओपीच्या मूर्ती न वापरता शाडू मूर्तींना नागरिकांनी प्राधान्य द्याव्ो, त्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असे मूर्तिकार सांगतात.शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकार बुकिंगनुसार ग्राहकांच्या पसंतीने मूर्ती बनवून देत आहेत. लालबाग, दगडूशेठ, भारतीय बैठक, बालगणेश आदी मूर्तींची बुकिंग मोठी आहे. विविध गणपतीच्या फोटोनुसारही मूर्तीकार ग्राहकांना मूर्ती बनवून देत आहेत. शाडूच्या गणेशमूर्ती बनविल्यानंतर त्या सुकण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. हिटर लावल्यास हा कालावधी चार दिवसांवर येतो. त्यानंतर पाचव्या दिवशी रंगकाम करून पुन्हा रंग सुकविण्यासाठी चार दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे एक मूर्ती बनविण्यासाठी साधारण आठ दिवस लागत असल्याचे मूर्तीकार सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here