कठीण काळात प्रजापिता ब्रह्मकुमारींनी पाठबळ दिले : वैशाली सूर्यवंशी

0
19

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

माझे वडील प्रजापिता ब्रह्मकुमारी चळवळीत सक्रीय होते. ते गेल्यानंतरच्या अत्यंत कठीण काळात याच परिवाराने मला पाठबळ दिले, जगण्याची उमेद प्रदान केली, असे भावपूर्ण प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले. त्या प.पू. ब्रह्माबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
सामनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रात ब्रह्मा बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. त्यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यानंतर केंद्राच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांनी आपले कुटुंब आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी चळवळ यांच्यातील भावबंधावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, माझे वडील तीर्थरूप तात्यासाहेब हे या चळवळीशी जुळलेले होते. ते स्थानिक केंद्रात तर जातच होते, पण अनेकदा माऊंट आबू येथेही गेले होते. त्यांच्या जीवनावर आध्यात्मिक मार्गाचा मोठा प्रभाव होता. तात्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतरच्या खडतर कालखंडात प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या स्थानिक दिदींनी मला मोठा धीर दिला. आज व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नसला तरी आपण नियमित ध्यान-धारणा करतो. आगामी काळात त्याला अजून जास्त वेळ देणार असल्याचे वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान, आपण एक विचार घेऊन पुढे चाललो आहोत. त्यात महिला म्हणून आपण सर्वांनी माझ्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. एखादी महिला ही अतिशय काटकसर करून ज्या प्रकारे संसार करून दाखविते, अगदी त्याचप्रमाणे राजकारणात आपण भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

याप्रसंगी शरद पाटील तालुकाप्रमुख, विनोद बाविस्कर, राजू पाटील, राजू काळे, पप्पू राजपूत, सावकार दादा, सुनील पाटील, अमरसिंग पाटील, अशोक कुमावत, मनोज पाटील, सचिन पाटील, मुन्ना अशोक पितांबर, श्रीराम ढमाले, किरण पाटील, देवा भाऊ, बापू पाटील, नितीन महाजन, संजय ठाकरे अशोक महाजन, एकनाथ महाराज, महान आप्पा पाटील, आनंदा पाटील, रवींद्र पाटील, कैलास पाटील, प्रवीण पाटील, हेमराज पाटील, समाधान पाटील, गफ्फार भाई, अभिषेक खंडेलवाल यांच्यासह समस्त तालुका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here