साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे माणुसकी जपणारे व्यक्तीमत्त्व आहे. ते सर्वांना प्रेमाने वागणूक देतात. त्यांच्यातील माणुसकीचा दिवाळीनिमित्त एक प्रत्यय जनतेला आला. दिवाळी ही आगळीवेगळी साजरी करण्याच्या संकल्पनेतून त्यांनी पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे योगेश महाराज यांच्या शाळेतील अनाथ, गरजू, मूकबधिर मुला-मुलींना भेटून त्यांच्यासोबत चर्चा केली. दिवाळीचे फटाके फोडून तसेच मुलांना मिठाईचे वाटप करुन दिवाळी साजरी केली. त्यांच्या माणुसकीला मुलांनीही साद दिली. यावेळी त्यांनी मुलांसाठी काही मदत व सहकार्य असल्यास केव्हाही सांगा मी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस कर्मचारी समीर पाटील, सुनील पाटील, राहुल बेहरे, विनोद बेलदार, योगेश पाटील, प्रकाश पाटील, जितेंद्र पाटील, प्रकाश शिवदे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.