ब्राह्मणशेवगेला व्हॉटसॲप गु्रपच्या माध्यमातून वृक्षारोपण

0
17

साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव ।

तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे ‘विधायक संदेश विवेकी समाज’ या सोशल मिडीयाच्या घोषवाक्याप्रमाणेच व्हॉटसॲप गु्रपच्या माध्यमातून मागील आठवड्यात जल व पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांनी सेवा सहयोग ग्रामोदय, भूजल अभियान वृक्षदिंडी उपक्रमाचे गुणवंतदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आई-वडिलांचे झाड, लेकीचे झाड’ संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते.

तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील भूमिपुत्र ज्यात न्यायाधीश, आयुक्त, तहसीलदार, वकील, सेवानिवृत अधिकारी, प्राध्यापक आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सेवा बजावणारे आर्मी, नेव्हीतील सैनिक, शिक्षक, पोलीस दलात सेवा बजावत असलेले बांधव, व्यापारी, शेतकरी आदींचा समावेश आहे. त्यातील अनेक बांधव गावापासून शेकडो मैल दूर असतांना गावाप्रती बांधीलकी व आपण गावाचे काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेने तसेच जागरुक वृक्षप्रेमी नागरिकांनी गावाच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी आर्थिक मदत केली.

त्यात वृक्षमित्र भूषण कैलास तुपे, अरुण राठोड, युवराज पवार, जगन्नाथ तुपे, संतोष देसले, चिंतामण शेळके, बबलू राठोड, अशोक जाधव, अतुल तुपे, मेजर नरेंद्र नेरकर, पोलीस पाटील राजेंद्र माळी, संभाजी पवार फौजी, सुनिल राठोड, प्रकाश राठोड, किरण देसले, सचिन पवार, महेंद्र साळुंखे, भाऊसाहेब साळुंखे, प्रदीप पवार, विश्‍वासराव मोरे, नितीन जैन, ॲड.शिवाजी बाविस्कर, ह.भ.प.विठ्ठल देसले, शांताराम नेरकर, आप्पासाहेब नेरकर, राहुल मोरे, गजानन बाविस्कर, संजय बाविस्कर, साकेत बाविस्कर, दत्तात्रय मोरे, संकेत पवार, रत्नाकर पाटील, पद्माकर पाटील यांच्या माध्यमातून झाडे लावण्यासाठी आर्थिक मदत केली. या माध्यमातून मिळालेल्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here