यावलला ‘एक पेड माँ के नाम’ अभियान राबवून वृक्ष लागवड

0
10

साईमत/ न्यूज नेटवर्क । यावल ।

वृक्ष लावण्याची सर्वोत्तम वेळ पावसाळ्यात असते. जी सामान्यत: जून ते सप्टेंबरपर्यंत असते. कारण माती ओलसर असते आणि पावसामुळे झाडाला आवश्‍यक पोषक द्रव्ये मिळतात. विशिष्ट प्रदेश, जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात आणि मातीच्या प्रकारासाठी वृक्षांची योग्य प्रजाती निवडून वृक्ष लागवड केली जाते. त्याचे निमित्त साधून तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ अभियान यावल येथे डॉ.कुंदन फेगडे यांनी आपल्या आईसोबत राबविले. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावल येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ अभियान संपूर्ण देशभर राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानिमित्त यावल येथील भाजपाचे युवा नेते डॉ. कुंदन फेगडे यांनी आपल्या आई कलावती फेगडे यांच्यासोबत वृक्षांची लागवड केली. यावेळी डॉ. प्रशांत जावळे, सुरेश जावळे उपस्थित होते.

ही मोहीम निसर्ग वाचविण्यासाठी आहे. वृक्ष लागवड करताना भाजपाचे युवा नेते डॉ.कुंदन फेगडे यांनी सर्व नागरिकांना मोहिमेत सहभागी होऊन निसर्गाच्या संवर्धनात सामील होऊन ठिकठिकाणी वृक्ष लागवड करावी, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here