साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
हरित महाराष्ट्र अभियानाला गती देण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जळगाव वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुभूती निवासी स्कूलच्या पाठीमागील राखीव वनातील (कक्ष क्रमांक ४०७) परिसरात वृक्षारोपण व ‘सीड्स बॉल’ पेरणीचा उपक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेत ५०० विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली, तर करंज आणि कांचन यांसारख्या स्थानिक वृक्षप्रजातींचे ३ हजार सीड्स बॉल पेरण्यात आले. वनक्षेत्रातील जैवविविधता टिकवणे आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवर: जैन इरिगेशनचे अजय काळे, संजय सोनजे, राजेश आगीवाल, राजेंद्र राणे; वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण व अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, तसेच क्षेत्रीय अधिकारी उमाकांत कोळी, हरिष थोरात, स्वप्निल गोसावी व संभाजी पाटील.
सहभागी सदस्य: गांधी रिसर्च फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर विक्रम अस्वार, मयूर देशमुख, शुभम काळे, गोकुळ सपकाळे, स्थानिक महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ.
मान्यवर, महिला बचत गट आणि ग्रामस्थांच्या सामूहिक श्रमातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या हरित मोहिमेमुळे राखीव वनक्षेत्रातील परिसंस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
