तीन नवीन कायद्याविषयी शांतता समितीची बैठक

0
25

साईमत/ न्यूज नेटवर्क/फैजपूर

तीन नवीन कायदे सोमवारी, १ जुलैपासून लागू केले आहे. कायद्याची जनजागृती तसेच लोकांना माहिती व्हावी, या उद्देशाने फैजपूर पोलीस ठाण्यात हद्दीतील पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित तसेच शांतता समिती सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी फैजपुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह होत्या.

देशात तीन नवे कायदे १ जुलै पासून लागू केले आहे. या कायद्याची जनजागृती व्हावी, यासाठी येथील पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात आली. दरम्यान भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता असे तीन नवीन कायदे लागू केले आहे. नवीन कायद्यांची लोकांना माहिती व्हावी, याविषयी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी बैठकीत माहिती देवून मार्गदर्शन केले. तसेच फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनीही लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता अशा नवीन कायद्यांची सविस्तर माहिती दिली.

यांची होती उपस्थिती

व्यासपीठावर फैजपुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक मयनुद्दीन सैय्यद तसेच बैठकीला प्रतिष्ठित नागरिक अब्दुल रऊफ जनाब, माजी नगरसेवक अमोल निंबाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रियाज, उमेश गुजराथी, शेख इरफान शेख ईकबाल, शेख एजाज, रशिद तडवी, शाकिर शेख, पत्रकार समीर तडवी, संजय सराफ, योगेश सोनवणे, शाकिर मलिक, इरफान शेख यांच्यासह पोलीस पाटील सुरेश खैरनार, नरेश मासोळे, हरिष चौधरी, तुषार चौधरी, अरफान तडवी, फारूक तडवी, विकास बोदडे, लक्ष्मण लोखंडे, प्रसन्नकुमार पाटील, निलेश सोनवणे, संजय चौधरी, संतोष सुरवाडे,दिनेश बाविस्कर, पुरुषोत्तम पाटील, रविंद्र साळवे, संगीता दांडगे, मिना चौहान व फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांच्यासह शांतता समिती सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गोपनीय पोलीस विजय चौधरी, हवालदार राजेश बऱ्हाटे, हवालदार सलिम तडवी, पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणेश गुरव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here